Header Ads

जिल्हा परिषद मैदानावर सातारा फेस्टीव्हलच्या भव्य स्टेजच्या उभारणीचा शुभारंभ satara

सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, सहकाररत्न स्व.श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या ७५ व्या जयंतीनिमीत्त श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर रविवार दि. ५ व सोमवार दि. ६ मे रोजी सातारा फेस्टीव्हल  २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. या बहुचर्चीत  फेस्टीव्हलच्या भव्य स्टेज उभारणीला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. या सातारा  फेस्टीव्हलमध्ये उच्च कोटीचे गायक, डान्सर आणि हरहुन्नरी विनोदी कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार असून सलग दोन दिवस गायन, नृत्य, कला आणि हास्याच्या खळखळाट होणार आहे. हा संपुर्ण कार्यक्रम सर्वांसाठी पुर्णपणे मोफत आणि खुला असून या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या कार्यक्रमांसारखे भव्यदिव्य स्टेज उभारणीस गुरुवारी प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्टेट उभाणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य राजू भोसले, प्रवीण पाटील, राजेश जोशी, अक्षय जाधव, मधूकर फल्ले, ओंकार भंडारी आदी उपस्थित होते.

रविवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता झी युवा वाहिनीवरील ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा बहुचर्चित युवोत्सव हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आदर्श शिंदे यांच्यासह विशाल साजन आणि रामानंद हे आपल्या मधुर आवाजाने सातारकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत तर, संस्कृती बालगुडे, पुजा सावंत, सई लोकुर, श्रृती मराठे, माधुरी पवार, किन्नरी दामा, रुतुजा राने हे आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुर्णिमा ओक यांचे दिग्दर्शन असून प्रियदर्शन जाधव, कमलाकर सातपुते, योगेश सिरसाट आणि हेमांगी कवी हे विनोदवीर हास्याचे कारंजे फुलवणार आहेत. सोमवार दि. ६ रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवात झी मराठी वाहिनीवरील चला हवा येवू द्या धुमाकूळ घालणार आहे. या कार्यक्रमात चला हवा येवू द्या मधील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश सिरसाट, श्रेया बुगडे आणि अंकुर वाढवे यांचा हास्यकल्लोळ पहावयास मिळणार आहे. या सातारा महोत्सवास झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी, तुझ्यात जीव रंगला, तुला पाहते रे, रात्रीस खेळ चाले आदी लोकप्रिय मालिकांमधील कलावंत उपस्थित राहणार आहेत. सातारकरांसाठी कला, सांस्कृतिक आणि अविस्मरणीय अशी विनोदाची मेजवाणी ठरणार्‍या या कार्यक्रमाचा सातारकरांसह जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments