Header Ads

टोलनाक्यावरील गुंडावर मोक्कान्वये करवाई करा ; संकल्प सेवाभावी संस्थेची पोलिस प्रमुखांकडे मागणी satara

सातारा : दि.१२ मे रोजी साताऱ्यातील युवक आनेवाडी टोलनाक्यावरून प्रवास करीत असताना येथील टोलनाक्यावरील विशाल पिसाळ या कर्मचाऱ्याकडून प्रवासी युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच आनेवाडी टोलनाक्यावरील गुंडावर मोक्काअंतर्गत करवाई करुन प्रवास्यांना भयमुक्त करुण सुखद प्रवास घडवून आणावा अशी मागणी संकल्प सेवाभावी संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चिन्मय कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ मी रोजी साताऱ्यातील काही युवक खाजगी कामानिमित्त पुण्याच्या दिशेने प्रवास करीत होते. चारचाकी टोलनाक्यावर पोहोचताच प्रवासी युवकांनी स्थानिक असल्याचे सांगितले. यावरून टोलकर्मचारी विशाल पिसाळ व प्रवास्यांमध्ये किरकोळ वाद झाला. टोल कर्मचारी विशाल पिसाळ व टोल नाक्यावरील १० ते १२ गुंडानी या प्रवासी युवकांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विजय पवार व प्रसन्न औसरे या युवकांना गंभीर मारहाण करण्यात आली. प्रवासी विजय पवार याच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून हल्लेखोरांनी ओढून घेतली. त्यानंतर तू आम्हाला ओळखत नाहीस जीवे मारुन टाकू तुला, तुज्यासारखे रोज १०० जण येतात इथे अशी धमकी देत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, सोन्याची साखळी चोरुन घेऊन गेल्याचे लक्षात येताच विजय पवार आक्रमक झाले व तिथेच बसले. मारहाणीचे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत जात असल्याचे लक्षात येताच टोलनाक्यावरील गुंडाकडून सोन्याची साखळी पवार यांच्या जवळ आणून टाकली. या सर्व घटनेवरून नागरिक व प्रवासी यांच्यात भीतीचे वातावरण तयार करुन लोकांना स्थानिक व्यवस्थापका कडून लुटले जात आहे. दरम्यान टोलनाक्यावरील गुंडावर मोक्कान्वये करवाई करून प्रवास्यांचा प्रवास भयमुक्त करावे अशी मागणी संकल्प सेवाभावी संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments