Header Ads

मुकूल माधव फाउंडेशनच्या आरोग्य तपासणी शिबीरास उस्त्फुर्त प्रतिसाद ; सेरेब्रल पाल्सीग्रस्त २०० हून अधिक बालरूग्णांची तपासणी संपन्न satara

सातारा : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फौंडेशन यांनी सेरेब्रल पाल्सी ग्रस्त मुलांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये  सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त असलेल्या बालरूग्णांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले होते. या शिबीराला 11 तालुक्यातील 200 हून अधिक बालरूग्ण व त्यांच्या परिवाराने सहभाग घेवून तपासणी करून घेतली. सातारा शहरातील सदरबझार परिसरातील कनिष्क हॉल येथे या दोन दिवसीय शिबीरात जिल्हा परिषदचे सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा रूग्णालय यांचे विशेष सहकार्य लाभले. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी या शिबीराच्या संयोजनासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. या बालरूग्णांच्या तपासणीसाठी पुणे येथील संचेती हॉस्पीटलचे ज्येष्ठ बालअस्थीरोग तज्ञ डॉ. संदीप पटवर्धन, मेंदूतज्ञ (न्युरोलॉजिस्ट) डॉ. अभिजीत बोथ्रे, भारती हॉस्पीटल, डॉ.ह.वि.देसाई हॉस्पीटल, केईएम हॉस्पीटल आदि मान्यवर हॉस्पीटलचे तज्ञ डॉक्टर्स यंाची पथके तपासणी व उपचार पध्दतीसाठी सहभागी झाली होती.

मुकूल माधव फाउंडेशनच्यावतीने केलेल्या सर्वे नुसार जिल्हयात 314 मुले हि सेरेब्रल पाल्सी ने  ग्रस्त असणारी मिळाली. सातार्‍या मध्ये मिशन सेरेब्रल पाल्सी सुरु केल्यानंतर गेली पाच वर्षे हे कार्य सुरू ठेवले आहे. आज मुकुल माधव फौंडेशन ने रत्नागिरी आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातील मिळून 772 सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांपर्यंत पोहचू शकले. यावेळी अधिक माहिती देताना संतोष शेलार म्हणालेकी, या प्रकल्पामध्ये मुकुल माधव फौंडेशन हे सातारा जिल्यातील 11 तालुक्यात सर्वेक्षण कयन या आजाराने ग्रस्त असलेल्या बालरूग्णांवर उपचार सुरू ठेवले आहेत तसेच सातारा, पाटण, वाई, पाचगणी येथे या बालरूग्णासाठी फि जीओथेरपी सेंटर कार्यरत आहेत.  मुकुल माधव फौंडेशन ने सर्वे नंतर 178 व्हीलचेअर, 100 सेरेब्रल पाल्सी चेअर आणि 100 क मोड चे वाटप केले आहे.

दोन दिवसीय शिबीरात मुकुल माधव फौंडेशन ने त्यानंतर पुण्यातील संचेती हॉस्पिटल,भारती हॉस्पिटल,केईएम  हॉस्पिटल,एच.व्ही. देसाई, हॉस्पिटल  या नावाजलेल्या हॉस्पिटल च्या मदतीने सातारा जिल्यातील 220 मुलांची पूर्ण तपासणी केली आहे.  या शिबीर प्रसंगी भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी उपस्थित रूग्णाचे परिवार व नातेवाईकांना बँकेच्या विविध बचतखाते, कर्जयोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष शेलार, मुकुल माधव फौंडेशनचे बबलू मोकळे, यास्मिन शेख, अभिषेक चौगुले, सचिन कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments