Header Ads

पाणीसाठ्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : माण व खटाव तालुक्यासाठी उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या उपलब्ध पाणीसाठ्याचा कुठेही अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिल्या. दहिवडी तहसिल कार्यालयात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांतांधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चारा छावणीमध्ये शिधा पत्रिकांचा कॅम्प आयोजित करावा अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, छारा छावणीमध्ये दाखल झालेल्या जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी टॅगींग करावे. छारा छावणीतील जनावरांना रोजच्या रोज चारा, पाणी  व पेंड व्यवस्थीत मिळतो की नाही याची वेळोवेळी तपासणी करावी. या संदर्भात छावणीतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी. तसेच पेंडचे स्टॉक रजिस्टर वेळोवेळी तपासावे. चारा छावणीतील जनावरांचे 100 टक्के लसीकरण करावे. चारा छावणीतील हालचाल रजिस्टर वेळोवेळी तपासावे. इरिगेशन, पोलीस व महसूल विभागाने आपआपसात समन्वय साधून अवैधरित्या उपसा कुठेही होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही शेवटी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.

No comments