Header Ads

माण-खटाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचा दिलासा ; टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू satara

सातारा : सातारा जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. तेच चित्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात देखील दिसून येत आहे. माण व खटाव तालुक्यातील काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे ब्रीदवाक्य ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार सामाजिक भावनेतून जनतेची गरज लक्षात घेऊन शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था मागणी करणाऱ्या गावात व वाडी-वस्तीवर १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव यांनी दिली.

No comments