Header Ads

विषप्राशन केल्याने जिल्ह्यातील चौघेजण रुग्णालयात satara

सातारा : सातारा जिल्हय़ात विष प्राशन केल्याच्या चार घटना घडल्या. कोणत्याही कारणातून विषप्राशन करण्याच्या घटना वाढतच असून आज लिंब, सातारा, महागाव व पाटण तालुक्यातील बांधवड येथील एकासह चौघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लिंब, ता. सातारा येथील शंकर सदाशिव सोनमळे वय-२७ या युवकाने दि. १३ रोजी दुपारी राहत्या घरी दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. यानंतर त्याला त्रास होवू लागल्याने उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत साताऱ्यातील शुक्रवार पेठेतील अविनाश सुनील घोरपडे वय-२७ या युवकाने मुंग्या मारण्याचा खडू खाल्ल्याने त्याला त्रास होवू लागला. घटनेनंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिसऱ्या घटनेत बांधवड, ता. पाटण येथील विष्णू मारुती सूर्यवंशी वय-३१ याने दि.१३ रोजीच्या रात्री दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. यानंतर त्याला प्रथम तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर मंगळवारी येथील सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर चौथ्या घटनेत महागाव, ता. सातारा येथील राजेंद्र संताप्पा तांबे वय-३५ याने दि.१४ रोजी सकाळी ७ वाजता रानात विषारी औषध प्राशन केल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

No comments