Header Ads

दाम्पत्याचा वाद सोडविताना महिलेकडून फौजदाराला धक्काबुक्की satara

सातारा : सार्वजनिक ठिकाणी पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक फौजदाराला धक्काबुक्की झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास गोडोली चौकीसमोर घडली. याप्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वाती जीवन पवार (वय २५, रा. रेणुका मंदिरासमोर,गोडोली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाती पवार आणि त्यांचे पती जीवन पवार यांची गोडोली पोलीस चौकीसमोर गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादावादी सुरू होती. त्यामुळे हा वाद सोडविण्यासाठी सहायक फौजदार राजेंद्र केळगणे आणि त्यांचे सहकारी हवालदार हिंडे हे तेथे गेले. वाद सोडवत असताना स्वाती पवार यांनी केळगणे यांना शिवीगाळ करत सरकारी गणवेशाची स्टार असलेली खांद्यावरील पट्टी पकडून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून शासकीय कामात अडथळा आणला.

No comments