Header Ads

सातारा लोकसभेच्या मतमोजणी तयारीच्या कामाचा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतला आढावा satara

सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. 23 मे 2019 रोजी होणार आहे. मतमोजणी दिवशी विविध कामासाठी नेमलेले नोडल अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिलेले  कर्तव्य  अतिश्य काळजीपूर्वक पार पाडावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी  श्वेता सिंघल यांनी आज दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीच्या पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. या  बैठकीस अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे  आणि मतमोजणीच्या कामासाठी नेमण्यात आलेले इतर सर्व नोडल अधिकारी  उपस्थित होते.

दि. 23 एप्रिल 2019 रोजी मतदान झाले असून दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने EVM मशिनच्या मतमोजणीबाबत नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच  व्हिव्हिपॅट मधील चिठ्यांचीही मोजणी केली जाईल. त्यासाठी नोडल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यासह  मोजणीसाठीही तसेच पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मतमोजणीच्या वेळी पत्रकारांसाठी माध्यम कक्षाचीही स्थापना करण्यात येणार असल्याचे श्रीमती सिंघल यांनी शेवटी सांगितले.

No comments