Header Ads

मी मताधिक्याचा कधीच विचार केला नाही : आ.शिवेंद्रराजे satara

सातारा : सातारा-जावली या विधानसभेच्या मतदारसंघातून खा.श्री.छ. उदयनराजेंना विरोधी उमेदवारापेक्षा किती मताधिक्य मिळेल असा प्रश्‍न आ.श्री.छ.शिवेंद्रराजेंना आयोजित पत्रकार परिषदेत विचारला गेला. यावेळी ते म्हणाले, आजपर्यंत मी विधानसभेच्या जेवढ्या निवडणुका लढवल्या, पण कधीही मताधिक्याचा विचार केला नाही. मग आता मी, का ? विचार करू असा उलट प्रतिसवाल त्यांनी केला. सातार्‍यात स्व. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या ७५ व्या जयंती निमित्त सातारा महोत्वस २०१९ चे आयोजन ५ ते ६ मे असे करण्यात आले आहे. त्या संदर्भात आ.शिवेंद्रराजेंनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

दरम्यान, सातारा-जावली या मतदारसंघातून खा.उदयनराजेंना किती मताधिक्य मिळेल, लोकसभा निवडणुकीत मनोमिलन झाले असल्यामुळे आता नगर पालिकेतही मनोमिलन का ? मिसळीची चर्चा आजही सातार्‍यात खमंगपणे चर्चिली जाते असे प्रश्‍न त्यांना विचारले गेले. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, मी आजपर्यंत विधानसभा निवडणुका लढविल्या पण कधीही मताधिक्याचा विचार केला गेला नाही. तसेच लोकसभेला पक्षाने खा. उदयनराजेंना उमेदवारी दिली होती. शरद पवार यांचे आदेश मानून आम्ही लोकसभा निवडणुकीत व्यासपिठावर जावून उमेदवारांच्या प्रचाराचे काम केले आहे. त्यामुळे पालिकेत मनोमिलन झाले असा अर्थ कोणी काढू नये. तसेच त्या हॉटेलची मिसळ चविष्ट आहे म्हणून चर्चा आहे. मी कोणासोबत मिसळ खाल्ली नाही तर पोहे खाल्ले आहेत, अशी टिप्पनी आ.शिवेंद्रराजेंनी केली.

No comments