Header Ads

कोयना धरणातून कर्नाटक राज्यास पाण्याचा विसर्ग सुरु ; कोयना धरणात सध्या २९.७७ टीएमसी पाणीसाठा patan

कोयनानगर : कर्नाटक राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईच्या परस्थिती निवारण करण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी कर्नाटक सरकारने करून यासाठी केलेल्या जलसामंजस्य करारानुसार राष्ट्रवर्धीनी असणाऱ्या कोयना धरणातून कर्नाटक राज्यासाठी साठी पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या विमोचक्र दरवाजा उघडून हे पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत धरणातून कर्नाटकसाठी २.९५ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे.

कर्नाटक राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाची दाहकता वाढली आहे. ही परस्थिती निवारण करण्यासाठी कोयना धरणातून ४ टीएमसी पाणीसाठा सोडण्यात यावे अशी मागणी कर्नाटक सरकारने केली आहे. कोयनेतून कर्नाटक राज्यासाठी पाणी सोडल्यावर अल्मट्टी धरणातून महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परस्थिती निवारण करण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.या दोन राज्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी या दोन्ही शासनाने जल सामंजस्य करार केला आहे.या करारा प्रमाणे कोयना धरणातून कर्नाटक राज्यासाठी धरणाच्या विमोचक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत कर्नाटक राज्यासाठी कोयना धरणातून २.९५ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे.अजून १.०५ टीएमसी पाणीसाठा १० मे पर्यंत देण्यात येणार आहे.सिंचनासाठी आता पर्यंत कोयना धरणातून ३३.४२ तर वीज प्रकल्पासाठी ४९.८७ टीएमसी पाणीसाठा वापरण्यात आला आहे. धरणात सध्या २९.७७ टीएमसी पाणीसाठा आहे.सिंचन व वीजनिर्मिती साठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा खालवला आहे.

No comments