Header Ads

शासनाने मदत देऊ अथवा न देऊ माण तालुक्यातील शेतक-यांसाठी छावणी सुरू ठेवणार : विजय सिन्हा man

म्हसवड : माणदेशी फौंडेशनची सुरू असलेली जनावरांची चारा छावणी हि सुरूच राहणार असुन, शासनाने मदत देऊ अथवा न देऊ परंतू हि छावणी फक्त माण तालुक्यातील शेतक-यांच्या जनावरांसाठी सुरू ठेवली जाणार असल्याचा दिलासा छावणी चालक विजय सिन्हा यांनी शेतक-यांना दिला. पर जिल्ह्यातील तालुक्यातील शेतक-यांसाठी त्यांच्या तालुक्यात शासनाने सुरू केलेल्या छावण्यांचा पर्याय उपलब्ध झाला असुन त्यांनी पर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पर्याय निवडावा असे ते शेतकऱ्यांच्या बैठकीत म्हणाले.

बजाज फौंडेशनचा देखील करार संपला असुन, छावणी बंद करावी लागणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे छावणीवरील शेतकरी चिंतेत पडला होता. या पार्श्वभुमिवर माणदेशी फौंडेशनचे विजय सिन्हा यांनी नुकतीच मेघासिटी येथिल चारा छावणीतील शेतक-यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना विजय सिन्हा म्हणाले, गेल्या चार महिन्यापासुन हि छावणी सुरू आहे. या छावणीतील जनावरांना सद्या पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे छावणी बंद करण्याची आमची मानसिकता झाली होती. या आशयाच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे शासनानेही याची दखल घेतली असुन महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मंत्री सदाभाऊ खोत यांचे छावणी संदर्भात चेतना सिन्हा यांच्याशी चर्चा झाली असुन छावणी बंद करू नये. छावणीतील जनावरांना प्रशासनाकडून पाणी पुरवठा करण्याचे अश्वासन दिले. परंतू सद्या पाण्याची उपलब्धताच नसल्याने आमचाही नाईलाज झाला असुन परजिल्ह्यातील शेतक-यांनी त्यांना त्यांच्या तालुक्यात शासनाने चारा छावणीचा पर्याय उपलब्ध करून दिला असुन त्या संबधित शेतक-यांनी तो पर्याय निवडावा असेही सिन्हा म्हणाले. फौंडेशनची हि छावणी अगदी डिसेंबर पर्यत चालवायची तयारी आहे. त्यातच याभागात पडणारा मौसमी पाऊस हा सप्टेंबर नंतरच पडतो. त्यामुळे अजुन चार ते पाच महिने तर पाण्याची टंचाई हि जाणवनारच आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांचे लाख मोलाचे असणारे पशुधन वाचने गरजेचे असल्यामुळे शासनाने मदत देऊ अगर न देऊ आम्ही हि छावणी सुरू ठेवणार असुन शेतक-यांनी चिंता करू नये असा दिलासा सिन्हा यांनी छावणी तील शेतक-यांना दिला आहे.

गेली चार महिन्यापासुन सुरू असलेली म्हसवड येथिल माणदेशी फौंडशनने चालवलेली चारा छावणी पाणी उपलब्ध होत नसल्याने बंद होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. माणदेशी फौंडेशन चारा छावणी बंद करणार अशा आशयाच्या बातम्या विविध दैनिकातून छापुन आल्या होत्या. त्यामुळे या छावणीवर गेल्या चार महिन्यापासुन नऊ ते दहा हजार जनावरे असलेल्या शेतक-यांची घाबरगुंडी उडाली होती. पोटच्यापोरा प्रमाणे संभाळलेली जनावरे कसायाच्या हवाली करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र भयंकर दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवुन म्हसवड येथिल माणदेशी फौंडेशनने गेल्या चार महिन्यापासुन बजाज फौंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात एकमेव चारा छावणी सुरू केली आहे. या छावणीवर माण तालुक्यासह परजिल्ह्यातील नऊ ते दहा हजार जनावरे आहेत. जनावराबरोबर शेतकरी देखील छावणीवरच मुक्कामी आहेत. याठिकाणी जनावरांना मुबलक चारा-पाणी दिला जात असुन या जनावरांसोबत असलेल्या शेतक-याना उन्हापासुन सरंक्षण मिळण्यासाठी नेट, रात्री उजेडासाठी लाईट सारखी सुविधा माणदेशी फौंडेशनने दिल्या आहेत. मात्र याठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असुन, पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे मोठी छावणी चालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

No comments