Header Ads

शिरवळ-लोणंद रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार khandala

शिरवळ : शिरवळ-लोणंद रस्त्यावर पिसाळवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे. कुमार उर्फ पप्पू ज्ञानोबा कांबळे (वय 32, रा.बौध्द आळी, शिरवळ, ता. खंडाळा) असे जागीच ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. दरम्यान, संबंधित कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी काहीकाळ आशियाई महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील कुमार कांबळे हा कुटुंबियांसह वीर धरणाकडे फिरायला जात असताना त्यांच्या मागोमाग शिरवळ येथून भादे, ता.खंडाळा गावच्या हद्दीतील वीर धरणाकडे दुचाकी (क्र. एमएच- 11-सीआर-3280) ने फिरायला निघाला होता. यावेळी दुचाकी पिसाळवाडी, ता.खंडाळा गावच्या हद्दीत गणपती मंदिराच्या पुढे भरधाव वेगाने आलेल्या कार (क्र.एमएच-12-एमएल-899) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारच्या धडकेत दुचाकीचालक कुमार कांबळे हा दुचाकीवरुन उडून कारवर जोरदार आदळला.

No comments