Header Ads

होमिओपॅथीमुळे रूग्णास लवकर फरक पडत नसल्याचा गैरसमज डॉ.अशोककुमार मोहंती यांचा दावा karad

कराड : होमिओपॅथी औषधामुळे कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नसून, अत्यल्प खर्चात रूग्ण बरा होतो. होमिओपॅथीमुळे रूग्णास लवकर फरक पडत नसल्याचा गैरसमज असल्याचा दावा होमिओपॅथीमधील तज्ज्ञ डॉ. अशोककुमार मोहंती यांनी केला.
 
होमिओपॅथी औषध उपचाराचे प्रचार, प्रसार व ज्ञानार्जनासाठी येथील स्टडी होमिओपॅथीतर्फे दिल्लीच्या आशा फाउंडेशनचे प्रमुख असलेले डॉ. अशोककुमार मोहंती यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मोहंती यांनी यावेळी चित्रफितीद्वारे रूग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती दिली. उपचारापूर्वी व उपचारानंतर अशा पध्दतीने योग्य उपचाराचे दाखले त्यांनी दिले. त्यात हॉस्पीटलमध्ये उपचार घेणाºया एका रूग्णाचा ताप अतिशय वाढला होता. अशा परिस्थितीत त्याने स्वत:च्या जबाबदारीवर रूग्णालय सोडण्याचा निर्णय घेऊन तो स्वत:हून होमिओपॅथीक उपचारासाठी डॉ. मोहंती यांच्याकडे आल्यानंतर मोहंती यांनी त्या रूग्णाच्या मनस्थितीचा अभ्यास करून होमिओपॅथीक औषध दिल्यावर अगदी काहीच तासांनंतर त्या रूग्णाचा ताप कमी होत जाताना त्याच्या सर्व शारिरीक तक्रारीही नाहिश्या होत गेल्या. अशा रितीने होमिओपॅथीक औषधाने लवकर गुण येतो हे मोहंती यांनी उपस्थित होमिओपॅथी डॉक्टरांना उदाहरणासह पटवून दिले. होमिओपॅथीक उपचार पध्दतीला राजाश्रय नाही, हे उपचार व औषधांमुळे रूग्णाला लवकर फरक पडत नाही. म्हणून, लोक या शास्त्राकडे नकारात्मकतेने बघतात. परंतु, होमिओपॅथीमधील जनरल प्रॅक्टीन्शरनी आपल्या दैनंदीन उपचारात होमिपॅथीक औषधाचाच वापर केला तर रूग्णावर कोणतेही दुष्परिणाम न होता अत्यल्प खर्चात उपचार करून खूप लवकर बरे करता येते असा विश्वास डॉ. मोहंती यांनी दिला. डॉ. मोहंती यांनी अनेक रूग्णांना दिलेल्या उचाराची चित्रफित दाखवली असता त्यात सर्व रूग्ण अतिशय कमी कालावधीत ठणठणीत झाल्याचे दिसत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र होमिओपॅथी कॉन्सीलचे सदस्य डॉ. सुनील मुळीक यांनी केले. तर, आभार डॉ. एम. बी. महाडिक यांनी मानले. डॉ. अजित जोशी, डॉ. सामिया शेख, मनिषा जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातून होमिओपॅथीक डॉक्टरांची उपस्थिती होती.

No comments