Header Ads

उंडाळे प्रादेशिकच्या पुनरुज्जीवनासाठी ५ कोटी निधी मंजूर karad

कराड : कराड दक्षिणेतील गावांना वरदान ठरलेली उंडाळे प्रादेशिक पाणी योजना पुनर्जीवित करण्याच्या माझ्या प्रयत्नांना यश आले आहे. मी केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेस पहिल्या टप्प्यात 4 कोटी 86 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जखिणवाडी, नांदापूर, कोयना,वसाहत यासह काही गावात ही योजना दुरुस्ती करून नव्याने कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. टंचाई आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ. आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते इंद्रजित चव्हाण उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कराड दक्षिणमधील टंचाईग्रस्त गावांना वरदान ठरली होती. योग्य देखभाल दुरुस्ती अभावी ही दुर्लक्षित होऊन कालांतराने बंद पडली. इतकी मोठी योजना त्याकाळी 35 ते 40 कोटी खर्चून उभी केली होती. आजच्या घडीला अशी योजना नव्याने उभी करताना किमान 80 ते 90 कोटी रुपये निधीही कमी पडेल. त्यामुळे या योजनेचा वापर करणे गरजेचे आहे.

No comments