Header Ads

वाई येथे प्रियकराच्या मदतीने पोटच्या पोराचा खून ; आईसह प्रियकरावर गुन्हा दाखल crime

वाई : वाई तालुक्‍यातील नावेचीवाडी येथे आईने प्रियकराच्या मदतीने पोटच्या पोराचा काटा काढल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली. नावेचीवाडी ता.वाई येथील १० वर्षाच्या गौरव चव्हाण या बालकाचा २९ एप्रिल रोजी देगाव गावच्या हद्दीतील कालव्यात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता आईनेच गौरवचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण वय-२८ व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार वय-४१ रा. बावधन या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने संशयितांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

No comments