Header Ads

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कलम 36 लागू satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील 6 व 7 मे  2019  रोजी परंपरंने शिवजयंती साजरी होत आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दि.6 व 7 मे  रोजी त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गासंबधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

No comments