Header Ads

किकली येथील शेतकर्‍याचा होरपळून मृत्यू wai

पाचवड : किकली (ता. वाई) येथील मळा नावाच्या शिवारात गट नंबर 978 मध्ये प्रकाश हणमंत शिंदे (वय 75) व त्यांचा मुलगा सोमवारी उसाची वाळलेली पाचट पेटवत होते. यावेळी पाय घसरून शेतात पडल्याने व आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रकाश शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला.

सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम संपल्याने बहुतांश तालुक्यातील ऊस तोडून गेला आहे. ऊस तोडून गेल्याने शिंदे हे शेत साफ करण्यासाठी सोमवारी पाचट पेटवण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांनी मुलाला सोबत होते. पाचट पेटवल्यानंतर त्यांना शेतातील पाईप दिसली. पाचटच्या आगीमध्ये पाईपलाईनचे नुकसान होऊ नये यासाठी ते पळत पाईपजवळ जात असताना पाय घसरून ते शेतात पडले. याचवेळी उन्हाचा तडाखा आणि वार्‍यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये शिंदे हे चांगलेच होरपळून निघाले. आग इतकी भीषण होती की आगीत भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने जवळच असणार्‍या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला यामध्ये यश मिळाले नाही. या घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा सपोनि श्याम बुवा व पीएसआय दुर्गानाथ साळी यांनी पंचनामा केला.

No comments