Header Ads

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वेतनाविना satara

सातारा : जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. वेतनास विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वेतन तातडीने व्हावे, अशी मागणी होत असून कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केले आहे. वेतन वेळेवर न झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बॅंकांचे हप्ते वेळेवर न भरल्याने अनेकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. मार्चच्या पगारास विलंब झाल्याने एप्रिल व त्यापुढील महिन्यांचेही पगार पुढे जाण्याची शक्‍यता आहे. त्याचा कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे वेतन वेळेवर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

No comments