Header Ads

ज्या क्षणी आपण दुसर्‍याला आनंद देतो तोच आपल्या सर्वोच्च आनंदाचा क्षण : डॉ.दिलीप शिंदे satara

सातारा : आपण आनंद मिळवण्यासाठी धडपड करतो पण साठीनंतर माणसांना उमगते की ज्या क्षणी आपण दुसर्‍याला आनंद देतो तोच आपल्या सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. असे उदुगार सांगली येथील संवेदना सुश्रुषा केंद्राचे संचालक डॉ. दिलीप शिंदे  यांनी काढले.  येथील कौशिक प्रकाशनच्यावतीने वृध्दत्व आनंदी कसे करावे या ज्येष्ठांसाठीच्या आगळयावेगळया लेखसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन समर्थ सदन राजवाडा सातारा येथे झाले यावेळी डॉ. द्लिीप शिंदे बोलत होते. या प्रकाशन सोहळयासाठी सांगली येथील साप्ताहिक आपले जगचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार वसंत आपटे हे कायंकमिाचे अध्यक्षस्थानी होते तसेच कौशिक प्रकाशनचे संपादक व प्रकाशक ज्येष्ठ करसल्लागार अरूण गोडबोलेयांची व्यासपीठवर प्रमुख उपसिथ्ती होती.

ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी राहण्यासाठी कसे जगावे याचे उकृष्ठ मार्गदर्शन या पुस्तकातील 32 लेखातून विविध तज्ञ मान्यवरांनी केले आहे. डॉ. अनिमेश चव्हाण, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सौ. शिंत्रे अशा अनेकांच्या लेखांचा संदर्भ देत डॉ. दिलीप शिंदे यांनी विश्‍लेषण केले. वृध्दपणी आनंदी राहण्यासाठी तरुणपणापासूनच मनाला योग्य वळण लावून निस्वार्थी, सेवाभावी वृत्ती जोपासली पाहिजे. अशी वृत्ती जोपासणार्‍या व त्यांंच्या केंद्रात राहणार्‍या वृध्दांची अनेक बोलकी उदाहरणे सांगताना श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. अध्यक्षपदावरुन बोलताना आपले जगचे सव्यसाची संपादक वसंत आपटे यांनी आनंद असतोच पण आपण तो न बघता दु:खालाच पकडू पाहतो त्यामुळे वृत्ती सुधारणे हेच यावर औषध असू शकते असे प्रतिपादन त्यांनी करताना हे पुस्तक प्रत्येक ज्येष्ठाने वाचलेच पाहिजे असेही त्यांनी म्हटले.

No comments