Header Ads

सातार्‍यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी satara

सातारा : चैत्र शुध्द पौर्णिमेच्या मुहूर्तावर आज शुक्रवारी राम भक्त हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात संपन झाली. सातारा शहर परिसरातील विविध हनुमान मंदिरात यानिमित्त विविध धार्मीक तसेच सामजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली .शहरातील यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिर, मंगळवार तळे रस्त्यावरील मंगल मारुती मंदिर, राजवाडा येथील वीर सिध्दी हनुमान मंदिर, शुक्रवार पेठेतील दक्षिणमूखी सरपंच मारुती,अजिंक्यतारा किल्लयावरील मारुती मंदिरात तसेच स्मृतीवनातील डोंगरावरचा मारुती,सज्जनगड येथील धाब्याचा मारुती, शनिवार पेठेतील शनी मारुती,विसावा नाका हनुमान मंदिर,नटराज मंदिरातील दास मारुती,करंजे पेठेतील हनुमान ंमदिरात,यादोगोपाळ पेठेतील एकता मारुती,शनिवार पेठेतील सोन्या मारुती,गुरुवार पेठेतील दंग्या मारुती,पोवई नाका येथील मारुती मंदीरात आज सकाळी सुर्योदयाचे मुहुर्तावर हनुमान जन्म करण्यात आला. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्‍वर डोंगरावरही स्वयंभु हनुमान मंदिरात आज सकाळपासुनच दर्शनासाठी मोठी गदर्ंी झाली होती.

यादोगोपाळ पेठेतील श्री गोलमारूती मंदिरात सालाबादप्रमाणे हनुमान जयंती उत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला. मंदिरास विशेष विद्युत रौषणाई तसेच गाभर्‍यात फुलांची केलेली नेत्र दिपक सजावट विशेष आकर्षण ठरत होती. प्रतापगंज पेठेतील प्रताप मारुती मंदिरात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात हनुमान जन्म करुन पाळणा म्हणण्यात आला.  गोल मारुती ंमंदिराचे पुजारी अरविंदपुजारी यांनी हनुमानाची विशेष पुझा केल्यावर   जन्मकाळाचे किर्तन सौ.विद्या दिवशीकर यांनी केले तसेच रात्री मंत्रपठण करण्यात आला. शुक्रवार पेठेतीुल दक्षिणमुखी सरपंच मारुती मंदिराला विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त गोलमारूती देवस्थान ट्रस्टचे वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यात  स्तोत्र पठण कार्यक्रम होवून आज पहाटे 6 वा. सौ.विद्या दिवशीकर यांचे जन्मकाळाचे कीर्तन होवून सकाळी जन्मकाळ साजरा होवून त्यानंतर महाआरती, सुंठवडा व प्रसाद वितरण करण्यात आले.गुरुवारी रात्री रामकृष्ण पाठशाळाच्या महिलांनी स्तोत्र पठण केले तर सायंकाळी बृह्मवृंदांनी मंत्रजागर केला. बालाजी ब्लड बँकेतर्फे आयोजीत रक्तदान शिबीरात अनेकांनी आज रक्तदान केले.आज दिवसभर भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

No comments