Header Ads

साताऱ्यातील डॉक्टर संदीप लेले यांचा अपघाती मृत्यू satara

सातारा : सायकलिंग करत महामार्गावरून जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत डॉ. संदीप लेले यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास झाला. डॉक्टर संदीप लेले यांना सायकलिंगची आवड असल्यामुळे ते रोज पहाटे सायकलवर खिंडवाडी येथे जात होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते सायकल घेऊन घराबाहेर पडले. पोवई नाका, शिवराज पेट्रोलपंपावरून ते महामार्गावरून खिंडवाडीकडे निघाले होते. यावेळी एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या अपघातानंतर काही नागरिकांनी त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाते उत्कृष्ट धावपटूही होते. तसेच सातारा हिल मॅरेथॉनमध्येही त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे.

No comments