Header Ads

वत्सलाताईंची खा.उदयनराजेंकडून विचारपूस satara

कराड : शिवसेना-भाजप युतीचे सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवार नरेंद्र पाटील व जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या मातोश्री श्रीमती वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांची खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी सह्याद्री हॉस्पीटल मध्ये भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील समोरासमोर लढत देत आहेत.

श्री.छ.उदयनराजे बुधवारी कराड-पाटण-ढेबेवाडी दौ-यावर होते. त्यावेळी श्रीमती वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांना कराडच्या सह्याद्री हॉस्पीटल मध्ये दाखल केले असल्याचे त्यांना समजले. काल सकाळी घरात पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आपल्या व्यस्त दौ-यातून वेळातवेळ काढून श्री. छ. उदयनराजे यांनी रात्री सह्याद्री हॉस्पीटलमध्ये भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, डॉ. शेखर घोरपडे उपस्थित होते. उदयनराजेंनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन श्रीमती पाटील यांच्यावरील उपचारा संदर्भात सुचना केल्या. उपचारात काही कमतरता पडू देऊ नका, असे त्यांनी सुचित केले. तसेच  वत्सलाताईं आईसाहेबांना लवकर आराम पडेल, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

No comments