Header Ads

तुषार भद्रे स्कूलच्या वतीने २५ एप्रिल पासून साताऱ्यात अभिनय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन satara

सातारा : ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे स्कूलच्या वतीने दि. २५ एप्रिल ते १० मे दरम्यान साताऱ्यामधे नाट्य व चित्रपट अभिनय व तंत्रप्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तुषार भद्रे व विद्यासागर अद्यापक यांनी दिली. या प्रशिक्षणवर्गास अतिथी मार्गदर्शक म्हणून अभिनेते उमेश जगताप, चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया, मानसशास्त्रज्ञ शिरीष शितोळे, डीओपी महेश डीग्रजकर, साउंड डिझाइनर कामोद खराडे आदी उपस्थित राहणार आहेत. या अभिनय प्रशिक्षण वर्गामध्ये मार्यादितानांच प्रवेश देण्यात येणार आहे.

यामधे नाट्य, चित्रपट, मालिका यातील अभिनय तंत्राचे धडे देण्यात येणार असून, गुणवत्तेनुसार मालिका,चित्रपट व नाटकात कामाच्या संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण वर्गास वय वर्षे ८ ते पुढील मुले, मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. सायोजाकांच्या वतीने सातारा शहराबाहेरील विद्यर्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर अभिनय व तंत्रप्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 9822276073 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वर्गसंचालक तुषार भद्रे व चित्रपट निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक विद्यासागर अद्यापक यानी केले आहे.

No comments