Header Ads

प्राची पाटील यांचा प्रचाराचा धडाका satara

सातारा : शिवसेना-भाजपा महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी यांच्या पत्नी डॉ.प्राची पाटील यांचा धडाक्यात प्रचार सुरु आहे. सौ.पाटील यांनी तापोळा, महाबळेश्वर परिसरातील ४३ गावात वाडी प्रचार करत घारोघारी पोहचून सामान्य मतदारांसोबतच महिला, वयोवृद्ध, दिव्यांग यांच्या गाठीभेटी घेऊन नरेंद्र पाटील उमेदवारीमागी भूमिका स्पष्ट केली. सौ.पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यात वाडी वस्तीवर घरोघरी जावून प्रचार केला. तापोळा परिसरातील तळदेव, ओगवे, रामेघर, वारसोळी, लाखवड, कुरोशी, चोगरेखांबील, वेंगळे, वाघेरासह ४३ गावांमधील मतदारांच्या गाठीभेठी घेतल्या. यावेळी हरिभाऊ सपकाळ, तानाजी भिलारे, संतोष जाधव, विशाल सपकाळ, संजय शेलार, गणेश उत्तेकर, काशिनाथ शेलार, तुकाराम सुतार, वैशाली भिलारे तसेच महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments