Header Ads

४५-सातारा लोकसभा मतदारसंघात सरासरी ६०.३३ टक्के मतदान ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांची माहिती satara

सातारा : ४५-सातारा लोकसभा मतदार संघात काल सकाळपासून मतदानाला उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली. काल दि. २३ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६०.३३ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज दिली.

काल दि. २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे. 256- वाई विधानसभा मतदार संघात 60.36 टक्के यामध्ये पुरुष मतदारांनी  105794 व स्त्री 93457, इतर 1 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 257- कोरेगाव मतदार संघात 60.65 टक्के मतदान झाले असून यामध्ये 96508  पुरुष मतदारांनी तर स्त्री 83495 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 259- कराड (उत्तर) मतदार संघात 63.04  टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरुष मतदारांनी 96574 तर स्त्री 86706 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 260- कराड (दक्षिण) मतदार संघात 63.11 टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरुष मतदारांनी 96655 तर स्त्री 85717 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 261- पाटण मतदार संघात 55.87 टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरुष मतदारांनी 81478 तर स्त्री 84894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 262- सातारा मतदार संघात 59.22 टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरुष मतदारांनी 102146 तर स्त्री 96008 व इतर 1 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

45-सातारा मतदार संघात बीएलओ यांनी घरोघरी जावून मतदान चिठ्या वाटप केल्या. या मतदान चिठ्यांमुळे मतदारांना आपले मतदार यादीतील नावाची माहिती मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध झाली. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेचे तंतोतंत   पालन करुन सर्व सुविधा देण्यात आल्या. यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर नेण्यासाठी व मतदान झाल्यानंतर घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था, मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा, रॅम्पची सुविधा यासह विविध सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच अंध मतदारांसाठी डमी ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आली होती या सहायाने अंध मतदारांनी कोणाच्या सहाय्याशिवाय मतदान केले. तसेच ज्यांची दृष्टी कमी आहे अशा मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर भिंगाची व्यवस्थाही करण्यात आली होती. विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या सखी मतदान केंद्राचा कारभार हा महिलांच्या हाती देण्यात आला होता. या सखी मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येक महिलेचे स्वागत करुन मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला. या सखी मतदान केंद्रामुळे महिलांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मोठी मदत झाली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणा घराची सुविधेबरोबर मेडिकल कीटी उपलब्ध करुन देण्यात आले होते. गरोदर महिला व वयोवृद्धांना मतदान केंद्राच्या बाहेर उभे न करता मतदान कक्षेत  थेट प्रवेश देण्याता आला.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान प्रक्रियेत महिला सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी जिल्ह्यात मोठी जनजागृती करण्यात आली. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत साताऱ्यात  मोठा कार्यक्रम घेण्यात आला. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी वेळावेळी जिल्ह्यात जनजागृतीबरोबरच नव मतदार नोंदणी कार्यक्रमही वेळोवेळी राबविण्यात आला. याचा परिणाम आज दिसून येत असून मतदानाचे टक्केवारी वाढली आहे. 45- सातारा लोकसभेचे मतदान काल दि.23 एप्रिल रोजी झाले.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, सर्व नोडल अधिकारी यांच्या योग्य नियोजनाचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सर्व ठिकाणी सुरळीत व शांततेच्या वातावरणात मतदान झाले.सरासरी 60.33 टक्के मतदान झाले आहे.

No comments