Header Ads

श्रीस्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात satara

वडूज : श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जय घोषात येथील वडूज-दहिवडी रोड वरील श्रीस्वामी मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रकटदिनानिमित्त रविवार, दि.७ रोजी श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट महाराज) देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 ते 8 दरम्यान अभिषेक, पूजा, सकाळी 8 ते 10 यावेळेत दत्त भजनी मंडळाचे भजन, सकाळी 10 ते 12.30 यावेळेत सुनेत्रा भंडारे-कुलकर्णी यांचे किर्तन, दुपारी साडेबारा वाजता गुलाल व फुले कार्यक्रम, त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंदिर पालखी प्रदक्षिणा झाली. प्रकट दिनानिमित्त दुपारी एक वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

No comments