Header Ads

फलटण येथीलगोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले satara

फलटण : येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले. शासकीय धान्य गोदामास सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हा प्रकार उपस्थित लोकांच्या लक्षात आला. गोदामाची चावी नसल्याने शटरचे कुलूप तोडण्यात आले. तोपर्यंत पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. पाण्याचे फवारे मारून काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. त्यामुळे या जुन्या शासकीय गोदामात २३२२.५० क्विंटल गहू, २४४९ क्विंटल तांदूळ, ७० क्विंटल साखर, २१३.५० क्विंटल तूरडाळ, १३० क्विंटल चणाडाळ अशा प्रकारचा लाखो रुपयांचा साठा सुरक्षित राहिला. मात्र, या आगीत हमाल बिल रजिस्टर, २ टेबल, ४ खुर्ची, २ पंखे जळून खाक झाले.

एकाच मीटरवर लोड...

मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामास शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामातील मीटरमधून वीज कनेक्शन घेण्यात आले होते. कुलर, फॅन, ट्यूबचा लोड एकाच मीटरवर आल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याची शक्यता गोदामाची पाहणी केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

No comments