Header Ads

पाचवड जवळील अपघातात दोघे ठार satara

पाचवड : महामार्गावरील पाचवड गावानजीक कार आणि दुचाकीच्या अपघातात दोघेजण ठार तर चौघे जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांची नावे अजून समजू शकले नाही. हा अपघात सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पुणेहून साताराच्या दिशेने जाणारी फोर्ड फियास्ट क्र.एमएच ०१बीबी ६२७९ या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजक तोडून साताराहून पुण्याच्या दिशेने जाणारी दुचाकी क्र.एमएच जेडब्ल्यू ९८५९ ला ठोकरल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात संतोष नामदेव माळी रा.वरुड, ता.खटाव आणि अक्षय विध्याधर कांबळी वय.२८ रा.गोडोली, सातारा असे मृत झाले आहेत. तर या अपघातातील जखमीवर सातारा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलिसांत झाली आहे. या अपघातातील जखमीची नावे समजू शकली नसल्याने पोलिस पुढील तपास करत आहेत.

No comments