Header Ads

निष्पक्ष आणि निर्भयपणे मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा : निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा satara

सातारा : 45- सातारा लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदनाच्या दिवशी सर्वांनी घराच्या बाहेर पडून निष्पक्ष आणि निर्भयपणे मतदान करुन आपली लोकशाही आणखीन बळकट करा, संविधाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे या हक्काचा वापर करा,  असे आवाहन निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या माहिती  आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजन आऊटरिज ब्युरोच्यावतीने मतदार जनजागृसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाला श्री. झा यांनी झेंडा दाखवून मार्गस्त केले. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  श्वेता सिंघल, खर्च निरीक्षक अल्पेश परमार, आचारसंहिता कक्ष साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, जिल्हा कोषागार अधिकारी  धनाजी शिंदे, एम.एसी. एम.सी. समिती सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक क्षेत्री प्रचार अधिकारी सतीश घोडके आदी उपस्थित होते.

45- सातारा लोकसभेसाठी मतदान 23 एप्रिल रोजी होणार आहे. नागरिकांनी निष्पक्ष आणि निर्भयपणे मतदान करा, सर्वांनी घराच्या बाहेर पडून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवा निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे. मतदान करण्यासाठी मतदान कार्ड नसेल तर 11 प्रकारचे ओळखपत्र जसे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, आधार कार्ड त्यासाठी गृहित धरले जातील. आपल्याकडे ओळखपत्र नाही म्हणून कोणीही मतदान करण्यासाठी टाळाटाळ करु नये,  असेही श्री. झा यांनी  यावेळी सांगिले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. 45- सातारा लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे व 100 टक्के मतदान करावे. मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने आपला मोबाईल घरीच ठेवून यावे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 15 प्रकारच्या सुविधा मतदान केंद्रावर देण्यात येणार आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी पाळणघराची सुविधाही देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीटही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.

एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी  प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर नेहण्यासाठी व मतदान केल्यानंतर घरी सोडवण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे. व्हिलचेअची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच अंध व्यक्तींसाठी डमी ब्रेल लिपीतील मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. या डमी मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान करु शकणार आहेत.  सातारा लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे या मतदनाच्या दिवशी  नागरिकांनी बाहेर पडून 100 टक्के मतदान करा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले. 23 एप्रिल रोजी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून 100 टक्के मतदान करा, असे आवाहनही खर्च निरीक्षक अल्पेश परमार यांनी यावेळी केले. या  चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

No comments