Header Ads

नगरसेवक बाळासाहेब खंदारेंकडून खा.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारला धडाक्यात सुरुवात satara

सातारा : सातारा नगर परिषदेचे नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्याकडून पाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची प्रभागातुन धडाक्यात सुरुवात करण्यात आली. यावेळी सातारा शहरातील ५०१ पाटी चौकातून शेटेचौक, मल्हारपेठ, पोवई नाका या मार्गावर प्रचार करण्यात आला. प्रचारा दरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी खा.उदयनराजेंना जास्तीत-जास्त मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवहान बाळासाहेब खंदारे यानी केले.  यावेळी माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, माजी नगराध्यक्ष अशोक तपासे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर नाना भोसले, माजी उपनगराध्यक्ष भाऊ दळवी, मा.नगरसेवक बाळासाहेब नाईक, नगरसेवक शकील बागवान, बाळासाहेब शिरसट, सतीश रावखंडे, युवानेते अर्जुन शिंदे, वाहिद शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments