Header Ads

धर्मवीर संभाजीराजे खऱ्याअर्थाने अष्टावधानी ; धर्मवीर संभाजीराजेंच्या पुण्यतिथीनिमित्त खा.उदयनराजेंकडून अभिवादन satara

सातारा : धर्मवीर संभाजीराजे यांचे शिवस्वराज्यातील योगदान अत्यंत अभिमानास्पद आहे. शिवछत्रपतींचा वारसा  तितक्याच समृद्धपणे पुढे नेणारे शंभूराजे हे खऱ्या अर्थाने अष्टावधानी होते. कला, क्रीडा, राजकारण, लेखन यांच्या बरोबरीने प्रसंगावधान राखण्याचे त्यांचे कसब थक्क करणारे होते, शिवस्वराज्यासाठी बलिदान देणारा छावा असा त्यांचा लौकिक पुढील कित्तेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी केले. श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा नगरपालिकेसमोरील उद्यानात शंभूराजे स्मारक स्थळाला भेट देऊन खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेवक मनोज शेंडे, गीतांजली कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मातृभाषेसह कित्तेक परकीय भाषांचा अभ्यास असणारे आणि विविध महत्वपूर्ण  ग्रंथ लिहिणारे शंभूराजे म्हणजे अलौकिक बुद्धिमतेचे आगर होते. युद्ध कलेमध्ये ते निपुण होतेच, याशिवाय करारीबाणा व माणुसपण जपणारे राजे म्हणूनही त्यांची इतिहासात ओळख आहे. साक्षात शिवप्रभूंचे सुपुत्र असणारे संभाजीराजे हे पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारे दीपस्तंभच होत, अश्या शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी संभाजी महाराजांची माहिती विषद केली.

No comments