Header Ads

सातारा लोकसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान ; अपवाद वगळता शांततेत मतदान satara

सातारा : लोकसभेच्या सातारा मतदारसंघासाठी मंगळवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा ४ टक्क्यांनी मतांची वाढ झाली आहे. या मतदानानंतर खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यासह एकूण ९ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद झाले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सातारा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मशिन बंद पडल्या. ज्या ठिकाणी मशिन बंद पडल्या, त्या बदलण्यात आल्या. यामुळे मतदान प्रक्रिया रखडली होती. याचा विचार करुन निवडणूक विभागाने मतदानासाठी सायंकाळी अर्धा ते एक तासापर्यंत वेळ वाढवून दिला होता.

No comments