Header Ads

सायगाव येथील दारु अड्ड्यावर मेढा पोलिसांची धाड ; सावज सावध झाल्यामुळे पोलीस रिकाम्या हाताने माघारी satara

सायगाव : जावळी तालुक्यातील सायगाव या बाजारपेठेच्या गावात खुले आम अवैध दारूविक्री होताना दिसते.यासंदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्याकडे सायगाव गावात अवैध दारूविक्री केली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.मग काय अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी तात्काळ थेट येथील अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिल्यामुळे मेढा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने रविवारी येथे धाड टाकली. मात्र सावज सावध झाल्यामुळे अखेर पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी मेढा पोलीस स्टेशनची कामकाज तपासणी करण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक धिरज पाटील हे आले होते.यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील यांचीदेखील मिटिंग आयोजित केली होती.यावेळी पोलीस पाटील यांच्याकडून तालुक्यातील सर्व माहिती घेत असताना सायगाव विभागातील अवैध दारू विक्रीची तक्रार धिरज पाटील यांच्या समोर आली.त्यामुळे खरंतर पाटील यांनाही 'नवल' वाटलं की दारूबंदी असलेल्या तालुक्यात दारूविक्री कशी काय.मग काय अप्पर पोलिस अधिक्षक पाटील यांनी सायगावातील त्या दारू अड्ड्यावर थेट कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मेढा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षकअजित पाटील ,कॉन्स्टेबल नितीन पवार,कणाके यांच्या पथकाने रविवारी सायगावातील त्या दारू अड्ड्यावर धाड टाकली.मात्र अप्पर पोलिस अधिक्षक यांच्याकडे झालेल्या अवैध दारूविक्री तक्रारीची माहिती येथील अवैध व्यवसायिकापर्यंत आधीच कोणी तरी पोचवल्याने सावज सतर्क झाले.त्यामुळे कारवाई करण्यास गेलेल्या मेढा पोलीस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

मुळातच दारू बंदी असलेल्या जावळीत यापुढे अवैध व्यवसाय चालू देणार नाही. आणि असे जर अवैध व्यवसाय आढळून आल्यास सबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.तसेच पोलीस पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहून अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे.

धिरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक

अवैध व्यवसायिकास माहिती देणारा खबरी नेमका कोण ?

सायगाव गावातील त्या दारूअड्ड्यावर खुलेआम अवैध दारूविक्री होते.हे सर्वश्रुत आहे.संबंधित दारुअड्ड्यावर मेढा पोलीस या आठवड्यात केव्हाही धाड टाकून कारवाई करणार हे नक्की होते.त्याबाबत पोलिसांनी गोपनीयता देखील बाळगली होती.तरीदेखील संबंधित दारूविक्रेत्यास याची माहिती दिली गेल्यामुळे सावज सावध झाले आणि पोलिसांना गोपनीयता बाळगूनही रिकाम्या हाताने परतावे लागले.मात्र संबंधित दारूविक्रेत्यास धाड पडणार याची माहिती देणारा नेमका खबरी कोण याचीच चर्चा परिसरात सुरू आहे.

No comments