Header Ads

कॉंग्रेस संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीला मदत का करायची ; आ.जयकुमार गोरेंचा माढ्यात रणजीतसिंह नाईक-निंबाळकरांना पाठींबा satara

सातारा : संधी मिळेल तिथे कॉंग्रेस संपविण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसला रणजीतसिंह नाईक-निंबाळकर हा घरचा उमेदवार सोडून मदत का करायची असा सवाल माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी करून माढ्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. म्हसवड व परिसरातील आ. गोरे  समर्थक कार्यकर्त्याची बैठक घेवुन मते जाणुन घेतली यावेळी गोरे बोलत होते. यावेळी या बैठकिस कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दत्तोपंत भागवत, माजी नगराध्यक्ष नितीनभई दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ वसंत मासाळ, वैशाली लोखंडे, शोभा लोखंडे, ईश्‍वरा खोत, माजी नगरसेवक बी एम अबदागिरे, सुरज ढोले, आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला मदत करायची हा प्रश्‍न आपल्या समोर आहे कारण इकडे विहिर तिकडे आड आहे.लोकसभा निवडणुका आल्यावर राष्ट्रवादीला आघाडीचा धर्म आठवतो. मात्र लोकसभा निवडणुका झाल्या कि, सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादी आपल्या विरोधात असते हिच परिस्थिती राज्यातही आहे. मागील निवडणुकीत कॉग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून सहाच खासदार निवडुन आले.यात कोल्हापुरचे मुन्ना महाडीकांना खासदार करण्याचे काम ज्या बंटी पाटीलांनी केले त्याच बंटी पाटलांना विधानसभेत पाडण्याचे पाप याच राष्ट्रवादीच्या महाडिकांनी केले.खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापुरच्या हर्षवर्धन पाटीलांनी मदत केली. त्याच हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्याचे पाप याच पवारांनी केले.ज्या उदयनराजे यांना खासदार करण्यासाठी जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केले त्याच कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवायचे काम या राष्ट्रवादीने केले.आज  गावागातला कार्यकर्ता राष्ट्रवादीशी संघर्ष करतोय तो राष्ट्रवादीच्या कुरघोडीना त्रासुन गेला आहे. तरी सुध्दा हे आघाडीचे विष प्यायचे पाप आपण करतोय.आम्ही एकत्र संघर्ष यात्रा काढुन शेतक-यांना कर्जमाफी द्या सांगत पुर्ण महाराष्ट्रात फिरलो पण जेव्हा हि संघर्ष यात्रा माण-खटाव मध्ये आली तेव्हा राष्ट्रवादीने बहिष्कार घातला.जयकुमारला थांबवता येत नाही हे लक्षात आल्यावर या बारामतीकरांनी आमच्या घरात भांडणं लावले हा त्यांचा धंदाच आहे म्हणा कारण जयकुमार असा ऐकत नाही हे कळल्यावर त्यांनी आमच्याच घरात भांडण लावले. लोकसभेला एकिकडे राष्ट्रवादी आहे यात आघाडीचा धर्म पाळायचा व दुस-या बाजुला जातीयवादी  भाजप शिवसेना असे आपल्या पुढे धर्मसंकट आहे आता या लोकाना मदत करायची का नाही दुस-या बाजुला रणजितसिंह निंबाळकर आपला घरातलाच माणुस आहे अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यावा हा यक्ष प्रश्‍न आहे, असे जय कुमार गोरे यांनी संगितले.

No comments