Header Ads

नटराज मंदिरात संगीत श्रीमद भागवत कथा व महाज्ञान यश सप्ताह सोहळयाचे आयोजन satara

सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात संगीत श्रीमद भागवत कथा व महाज्ञान यश सप्ताह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दि. 2 मे ते 8 मे 2019 दरम्यान संपन्न होणार असून याची वेळ सकाळी 8 ते 12 संहितावाचन, व दुपारी 4 ते 7 कथावाचन अशी राहणार आहे.

या भागवत सप्ताहात बीड जिल्हयातील दादेगाव येथील समर्थ सत्संग परिवार समर्थशिष्य, सदगुरू श्री देविदास स्वामी मठाचे अध्यक्ष समर्थभक्त मंदारबुवा रामदासी करणार आहेत. त्यांच्या सुमधूर सुश्राव्य संगीतमय कथामृताचा सातारा जिल्हावासियांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोंजकांनी केेले आहे. नटराज मंदिराच्या परम पवित्र ठिकाणी गोरक्षक भगवान श्रीकृष्ण कृपाप्रसादाने विश्‍वकल्याणार्थ हा भागवत सप्ताह आयोजित केला आहे. मागील वर्षीही भागवत सप्ताहाला सातारकरांनी मोठया संख्येने उपस्तथीत  राहून लाभ घेतला होता. यावर्षी होणार्‍या सप्ताहाच्या अधिक माहितीसाठी 9421372633 व 9823175100 यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

No comments