Header Ads

मोदींनी ५ वर्षात देशाची अक्षरश: धुळधाण केली : पृथ्वीराज चव्हाण satara

सातारा : छत्रपतींच्या राजधानीत यापूर्वीचे सर्व रेकोर्ड मोडून देशात सर्वाधिक मतांनी महाराज निवडून येतील अशी मला खात्री आहे. गतवेळी अवघी ३१ टक्के मते मिळवून सत्तेवर आलेल्या मोदींनी या पाच वर्षात देशाची अक्षरशा: धुळधाण केली आहे. पंतप्रधान पदावरिल व्यक्तीने  सर्व संकेत धुळीस मिळवून व्यक्तिगत टिका करणे त्यांना शोभत नाही. अशी टीका माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमदार चव्हाण म्हणाले, खा.उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता अर्ज भरण्याची रॅली म्हणजे यशाचे पाऊलच आहे. महाराजांचा विजय म्हणजे केवळ औपचारिकताच आहे. देशातील मोदी लाट आता ओसरली असुन दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, अशा खोट्या आश्वासनांच्या बळावर भाजप आघाडीने जनतेस फ़सवले. म्हणूनच या निवडणूकीत अशा घोषणाबहादुरांना धडा शिकवायला हवा. सामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये आणि २ कोटीं लोकांना रोजगार मिळालाच नाही. त्याऐवजी नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना आणखी गाळात घालण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना विजयी करून देशात सत्तांतर घडवा आणि देश एका नव्या परिवर्तनाच्या वाटेवर न्या. खोट्या आश्वासनाला कंटाळलेली जनता आता नक्कीच देशात क्रांती घडवेल, असा विश्वासही यावेळी आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

No comments