Header Ads

महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना संपूर्ण ताकदीने पाठिंबा देवून विजयी करणार : सुशीलदादा मोझर satara

सातारा : पाडव्याच्या मूहूर्तावर भाजप-शिवसेना-रिपाइ महायुतीचे उमेदवार माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या झंझावाती प्रचाराचा शुभारंभ सुशीलदादा मोझर यांनी आज केला आहे. जूने ‘राजे प्रतिष्ठान’ व ‘रक्षक प्रतिष्ठान’ चे आपले सातारा जिल्ह्यातील सर्व कट्टर समर्थक, मावळे, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांच्यासह एकमताने आजपासून महायूतीच्या उमेदवारास विजयी करण्यासाठी जीवाचे रान करण्याचा नि:श्चय केला असल्याचे सुशीलदादा मोझर यांनी सांगितले. सातारा लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवाराचे काम करीत असताना सर्व प्रकारच्या सामाजिक कामांत पाठिशी खंबीर उभे राहून सर्वतोपरीने ताकद देणार असल्याचे आश्वासन भाजपा नेते व राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सुशीलदादा मोझर यांना दिले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात व अगामी काळात विधानसभेनंतर संपूर्ण राज्यांतही भाजप- शिवसेना महायुतीचे सरकार बहुमताने पून्हा विजयी होणारं यांत शंका नाही. जनहिताची कामे करण्याच्या प्रवृत्तीमुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मा. चंद्रकांतदादा पाटील यांसर्वांच्या नैतृत्वावर जनतेचा असलेला दृढ विश्वास युतीसरकारला पून्हा विजयी करणार आहे. आपले सर्व कट्टर समर्थक, मावळे व कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार आणि हितचिंतकांसोबत मागील काही आठवड्यांपासून आपल्या गाठीभेटी व विचारविनीमय सुरू होता. या सर्वांनी एकमताने भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना संपूर्ण ताकदीने पाठिंबा द्यावा असा आग्रह धरला होता. आगामी निवडणूकांनतर महायुतीचेच सरकार राज्यांत स्थापन होणार असल्यानेच आपल्या कार्यकर्त्यांची, समर्थकांची शासनदरबारातील व इतर कामे न रखडता व्हावीत व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करता यावे याकरीता आपण भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पूर्ण ताकदीने या निवडणूकीत उतरून, प्रभावी प्रचार यंत्रणा राबवून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतून नरेंद्र पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्क्य आपण देणार अहोत. जुने राजे प्रतिष्ठान, रक्षक प्रतिष्ठान व मित्र समूहाचे प्रत्येक तालुक्यात कट्टर कार्यकर्ते आहेत, स्वतंत्र गट आहे. आपण केलेल्या सामाजिक कामांमुळे या सर्वांचाच आपल्याला मनापासून पाठिंबा आहे. हे सर्वजण सक्रिय होवून नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात उतरून त्यांना जास्तीत जास्त बहूमतांनी विजयी करण्याचा निर्धार सर्वांनीच केला असल्याचे मोझर यांनी सांगितले.

येत्या २३ एप्रिल रोजी सातारा लोकसभेसाठी मतदान होणार आहे. आजपासून जिल्ह्यातील आपले कार्यकर्ते व समर्थकांसह आपण प्रत्येक तालुक्यांत स्वत: जावून लोकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेवून संपूर्ण मतदार संघ नरेंद्र पाटील यांना बहुमत मिळवून देण्यासाठी पिंजून काढणार अहोत. महायुतीचे उमेदवार साताऱ्यातून नक्कीच विजयी होणार आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन व्यवस्था आणून; सातारा जिल्ह्याच्या खुंटलेल्या औद्योगिक, शैक्षणिक तसेच सर्व स्तरावरील विकासास चालना देण्यासाठी, सर्वसामान्य जनतेची सुख-दुःख समजून त्यांच्या साठी झटणारे ‘भाजप-शिवसेना-रिपाई महायुती’ चे उमेदवार नरेंद्र पाटील यांना बहुमताने पाठिंबा देण्याचे अवाहन सुशिलदादा मोझर यांनी केले.

No comments