Header Ads

आ.जयकुमार गोरेंचा धुळे मतदारसंघात प्रचार ; प्रदेशाध्यक्षांसमवेत शिर्डीत साईबाबांचे घेतले दर्शन satara

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आ.जयकुमार गोरे नुकतेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आ.गोरे सहभागी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत आ.गोरे यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन देखील घेतले असल्याची छायाचित्रे त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर प्रसिध्द करण्यात आली आहेत. दरम्यान, आ.गोरे यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला अन कोणाच्या पाठीशी उभे रहायचे, अशी विचारणा केली होती. स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांनी रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या पारड्यात माप टाकले. आ.गोरेंनी नियोजनबध्द भूमिका घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु उलट आ.गोरे व आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठका झाल्या. तर आ.चव्हाण यांनी रणजितसिंह ना.निंबाळकर यांचा भाजपप्रवेशाचा निर्णय र्दुदैवी असल्याची मोजकी प्रतिक्रिया व्यक्त केली. तद्‌नंतर आ.गोरे माढा आणि सातारा दोन्ही मतदारसंघातील प्रचारात सहभागी झाले नाहीत. मात्र, शुक्रवारी ते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समवेत शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेताना आणि धुळे मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून आले.

No comments