Header Ads

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साताऱ्यात मतदान करुन कर्तव्य बजावले satara

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजल्यापासून उत्साहाच्या वातावरणात मतदानाला सुरु झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल आणि त्यांचे पती कोल्हापूर परिक्षेत्राचे प्राप्तीकर सहसंचालक पुर्णेश गुरुरानी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी त्यांच्या सहपत्नीक श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यामंदिर, गोडोली, सातारा येथे आज मतदान केले. आत्तापर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी मोठा उत्साह दाखवला दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रात घेऊन व मतदान झाल्यानंतर घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.

युपीएससी परीक्षे नुकत्याच्या पास झालेल्या स्नेहल नाना धायगुडे यांनीही बोरी ता. खंडाळा येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले. तसेच आंतरराष्ट्रीय एथेलेटीक खेळाडू चैत्राली गुजर या युवतीने सातारा विधानसभा मतदार संघातील 306 मतदान केंद्रात जावून मतदान केले. सातारा विधानसभा मतदार संघात शाहुपूरी येथे सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रांवर महिलांनी उत्साहाच्या वातावरणात मतदान केले. तसेच वाई मतदार संघात नायगाव ता. खंडाळा या सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचे स्वागत करुन त्यांना मतदान कक्षेत प्रवेश देण्यात आला. मतदारांचा उत्साह पाहता मतदानाचा टक्का नक्की वाढेल.

No comments