Header Ads

माथाडी कामगारांचा खा.उदयनराजेंना पाठिंबा satara

सातारा : माथाडी कामगारांचे नेते बाबुराव रामिष्टे यांचे चिरंजीव अविनाश रामिष्टे यांनी आज खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन माथाडी कामगारांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार खा.उदयनराजे भोसले यांनी आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अविनाश रामिष्टे यांनी उदयनराजेंना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. उदयनराजेंनी कायम माथाडी कामगारांची पाठराखण केली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांनी उदयनराजेंना भरभरुन मतदान केले. याही वेळी उदयनराजेंचे मताधिक्य वाढवण्यात माथाडी कामगार मोलाचे योगदान देतील, असा विश्वास अविनाश रामिष्टे यांनी या निमित्ताने बोलताना व्यक्त केला. यावेळी श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अविनाश रामिष्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ.आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सभापती सुनील काटकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments