Header Ads

माढा लोकसभा मतदार संघातून सह्याद्री कदम यांची निवडणुकीतून माघार satara

सातारा : भारतीय जनता पार्टी फलटण तालुकाध्यक्ष श्री.सह्याद्री चिमणराव कदम यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विचारात न घेतल्याने त्यांनी अपक्ष फॉर्म दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी फॉर्म माघारी घ्यावा यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून बराच प्रयत्न केला गेला.

सुरुवातीला ना. सुभाष यांनी सह्याद्री कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांची नाराजी कायम राहिली त्यानंतर ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी सह्याद्री कदम यांच्या सोबत दोन वेळा बैठक घेतली. तसेच माजी खासदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांनी हि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर ना. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सह्याद्री कदम  यांच्यात दोन वेळा सकारात्मक चर्चा घडवून आणली. या सर्व घडामोडी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. सुभाष देशमुख, ना.चंद्रकांत दादा पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील. विक्रम पावसकर, शहाजी बापू पवार,  राजकुमार नाना पाटील या सर्वांच्या विनंतीवरून सह्याद्री कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन आपली पूर्ण ताकद लाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी करण्याचे जाहीर केले.

No comments