Header Ads

लिंब गोवे येथे श्रीकृष्णाबाई उत्सवाचे आयोजन satara

सातारा : सातारा तालुक्यातील लिंब गोवे येथील श्रीकृष्णाबाई उत्सव संस्थेच्यावतीने येत्या सोमवार दि. १५ एप्रिल ते शनिवार दि. २० एप्रिल दरम्यान वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवारी १५ एप्रिलला सकाळी श्रींची स्थापना, अभिषेक, पुजा, आरती, नैवेद्य, सायंकाळी आरती व मंत्रजागर व रात्री ९ वा. पदमाकर पाठकजी यांच्या सुधीर फडके यांच्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी १६ रोजी सकाळी पुजा आरती, स. ११ वा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरूणा ढेरे यांच्या उपस्थितीत श्रीनिवास वारूंजीकर व सहकार्याचा कवितांवर कार्यक्रम. सायं. ५ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ६ वा. मीना सुपनेकर यांचा गायन कार्यक्रम, व रात्री ९ वा. बुधवार दि. १७ रोजी सकाळी अभिषेक, पुजा, आरती, सायं.७ वा. बालकीर्तनकार धु्रव पटवर्धन याचे कीर्तन,  दि.१८ रोजी सकाळी पुजा व आरती, रात्री ७ वा. खिंडीतील गणपती आरती मंडळाचा स्त्रोतपठन, रात्री ९ वा. श्रीकृष्णामाई भक्त मंडळ यांचा भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम,  दि.१९ रोजी सकाळी पुजा, अभिषेक, आरती व धार्मिक कार्यक्रम, सकाळी १० वा. अ‍ॅड. विद्यागौरी ठुसे यांचे प्रवशन,सायं. ७ वा. श्रींची छबिना मिरवणूक व आरती, शनिवार दि. २० रोजी अभिषेक, पुजा, आरती सकाळी ११ वा. वार्षिक सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणीची निवड व श्रींचे उत्थापन होणार आहे.

संस्थेच्यावतीने श्रीकृष्णाबाई उत्सव संस्था लिंब या नावाने फेसबुकवर पेज तयार केले असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व जास्तीत जास्त लाईक नोंदवावेत. यात्रा काळात दर्शनासाठी सातारा बसस्थानकावरून दर अर्ध्या तासाला एसटीची सोय असून टॅक्सीही मिळू शकतात तसेच लिंब फाटयावरून शेअर रिक्षा पध्दतीने वाहतूक सुरू आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यवाह वि.द.वारूंजीकर फोन 284476 व 284439 व श्री वाय..के.कुलकर्णी फोन 9423034787 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments