Header Ads

सचिन पडळकरांना माढ्यातून प्रहार जनशक्तीची उमेदवारी satara

सातारा : युवानेते सचिन पडळकर यांनी यवतमाळ येथे नुकतीच प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाला  सचिन पडळकर यांनी रामराम ठोकल्यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख अतुल खूपसे-पाटील व आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात युवानेते सचिन पडळकर व रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख जगन्नाथ जानकर होते. दरम्यान काल रात्री उशिरा अतुल खूपसे, जगन्नाथ जानकर, सचिन पडळकर, विकी मोरे यांनी यवतमाळ येथे आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन माढा मतदारसंघातील आढावा सांगितला. एखाद्या पक्षाबरोबर जाण्यापेक्षा आपल्या स्वतःचा हक्काचा उमेदवार असावा अशी भावना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याची होती. तसेच धनगर समाजाचे साडेसात लाख मतदान असूनही त्या पक्षाने एकही या समाजासाठी उमेदवार दिला नाही हा अचूक निशाणा साधत आणि कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून आज संध्याकाळी त्यांच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे.

दरम्यान माढा लोकसभा मतदार संघातील धनगर व विविध संघटनांनी पाठींबा दिलेले युवानेते सचिनशेठ पडळकर उद्या (गुरुवार) दि. ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने माढा मतदार संघात जोरदार शक्तिप्रदर्शनहोणार असून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथ जाणकर, विनायकशेठ मासाळ, अंकुश माने, आबासाहेब मोटे, सतीश येडगे, बजरंग खटके, पै.संजय दिड्वाघ यांसह प्रहार जनशक्तीचे माढा मतदार संघातील गावोगावचे कार्यकर्ते, युवक व आदी मान्यवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅलिस उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता म्हसवड येथुन रॅलिस प्रारंभ होईल त्यानंतर ही रॅली वाजत-गाजत पिलीव, वेळापूर, अकलूज, टेंभूर्णी, कुर्डूवाडी, माढा, मोहोळमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जाऊन युवानेते सचिनशेठ पडळकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढा मतदार संघातील कार्यकर्ते व नागरिक बंधू-भगिणींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments