Header Ads

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रोल रुमला निरीक्षकांची दिली भेट satara

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमला आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च पडताळणी निरीक्षक अल्पेश परमार, पोलीस विभागाकडील निरीक्षक सुरीदरकुमार कालीया यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, आचार संहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण  301 मतदान केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टींगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे तसेच ज्या ठिकाणी वेबकास्टींग शक्य नाही अशा  दुर्गम भागातील मतदान केंद्रावर वॉकीटॉकीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. याचे प्रात्यक्षिक आज निवडणूक निरीक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुममध्ये दाखविण्यात आले. वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली. यावेळी  निवडणूक निरीक्षकांनी लोकसभेच्या अनुषंगाने केलेल्या या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

No comments