Header Ads

धोम कालव्यात वृद्धाचा मृतदेह आढळला satara

कोरेगाव : सातारारोड, ता. कोरेगाव येथे धोम डाव्या कालव्याजवळ अर्जुन बाजीराव जाधव (वय ६५, रा. वैभव सोसायटी, सातारारोड) यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.दोन दिवसांपूर्वी अर्जून जाधव हे आपल्या मुळ गाव असलेल्या भोसरे, ता. खटाव येथून सातारारोड येथे मुलाकडे येण्यासाठी निघाले होते. परंतु ते सातारारोड येथे मुलाकडे पोहचलेच नाहीत. शुक्रवारी सकाळी नागरिकांना धोम कॅनॉल शेजारी त्यांचा मृतदेह दिसून आला. सातारारोड पोलीस दुरक्षेत्रात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृतदेहाचे कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

No comments