Header Ads

शॉक लागून एकजण जखमी satara

सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या शाहूपुरी येथे घरी रंगकाम करत असताना ओला बॅ्रश वायरला लागून शॉट सर्किट झाल्यामुळे एकजण ५0 टक्के भाजले असून त्यांच्यावर येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवाजी जिजाबा करपे (वय ६0, रा. आझादनगर, शाहूपुरी, सातारा) हे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घरी रंग देत होते. त्यांच्या हातात असणारा ओला ब्रश एका वायरला लागला. यात शॉर्टसर्किट झाले. यामुळे लागलेल्या आगीत शिवाजी करपे भाजले. या घटनेनंतर करपे यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

No comments