Header Ads

निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची छानणी satara

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी ६०.३३ टक्के मतदान झाले आहे. मतदानाविषयी आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांच्या उपस्थितीत मतदान केंद्रावरील कागदपत्रांची छानणी करण्यात आली. ही छानणी सातारा एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, सर्व सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा लोकसभा मतदार संघासाठी काल दि.२३ एप्रिल रोजी मतदान झाले. या मतदाराना विषयी कुणाची शंका किंवा तक्रार आहेत का याबाबत विचारणा करण्यात आली. तसेच मतदानाच्या दिवशी  वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची छाणनी यावेळी करण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीविषयी कुठलीही शंका किंवा तक्रार नसल्याचे यावेळी सांगितले.

No comments