Header Ads

अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू satara

सातारा : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नरेश खडकसिंग बोहरा (वय २७, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. काशीळ) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजता झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नरेश बोहरा हा गेल्या काही वर्षांपासून काशीळ येथील एका ढाब्यावर वेटरचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी काही कामानिमित्त तो दुचाकीवरून जात असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नरेश हा दूरवर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखम झाली. रुग्णवाहिकेतून त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला

No comments