Header Ads

सकाळी काढलेला आदेश सायंकाळी रद्द : माहिती मागविणान्यांच्या कारवाईचा फतवा फुसका ; जिल्हयातील कार्यकत्यांनी केला निषेध satara

सातारा : कायदेशीर, नियमातून, पारदर्शक कारभार होण्यासाठी माहिती अधिकार कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासकिय यंत्रणा आग्रही आहे. मात्र अपंग कल्याण आयुक्तांनी दोन पेक्षा अधिक वेळा माहिती अधिकार अर्ज करणारांच्यावर कारवाई करण्याचा फतवा सकाळी काढून राज्यभरात ईमेलवरून पसरवला. त्यास माहिती अधिकार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ विरोध करून असा आदेश गैरलागू असल्याचे निदर्शनास आणून दिले. सकाळी काढलेला आदेश सायंकाळी रद्द करण्याची नामूषकी अपंग कल्याण आयुक्तांच्यावर आली. कायदयाचे अज्ञान असणारांनी आधी अभ्यास करावा. प्रामाणिकपणे आणि पारदर्शक कारभार केल्यास माहिती अधिकारात अर्ज करावे लागणार नाहीत. माहिती अधिकार कायद्याला हरताळ फासणारा चुकीचा आदेश काढणाऱ्या अपंग कल्याण आयुक्तांचा जिल्हयातील माहिती अधिकार चळवळीचे कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रक काढून निषेध करत असल्याचे कळविले आहे.

जिल्हयात गेली १५ वर्षापासून जिल्हा प्रशासन माहिती अधिकार कायदा, सेवाहमी कायदा, स्वमंघोषित माहिती, शासन आदेश, परिपत्रकांची अंमलबजावणी प्रभावी करण्यात यशस्वी झाली आहे.यामुळे इतर जिल्हयाच्या मानाने सातारा जिल्हयात माहितीच्या अधिकार कायदयातंर्गत अर्ज करण्याचे प्रमाण कमी आहे.मात्र याच कायदयाचा वापर करुन जिल्हयातील अनेक लक्षवेधी प्रकरणांचा पोलखोल या चळवळीतील कार्यकत्यांनी केला आहे. गेल्या आठवडयात अपंग कल्याण आयुक्तांनी माहिती अधिकार कायदयांतर्गत दोनपेक्षा अधिक वेळ अर्ज करणारांनी नाव,पत्ते कळवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा फतवा ईमेल व्दारे जारी केला. कायदेशीर  आणि कोणत्याच नियमांचा आधार नसलेला हा आदेश चुकीचा असल्याचे चळवळीतील कार्यकत्यांनी आयुक्तांना निर्देशनास आणून दिले.कायदयाचे अज्ञान असलेल्या या आयुक्तांना त्यांच्या वरिष्ठांनी ही चांगलेच  झापले, तर चळवळीतील कार्यकत्यांनी समोरासमोर  रोखठोक सवाल करून कायदयाचे उद्देश, अंमलबजावणी हेतू स्पष्ट केल्यावर सदर चुकीचा आदेश अवघ्या सात तासात मागे घेतला. सदर फतव्याच्या आधारे कोणावर ही कारवाई होणार नाही, असा नव्याने आदेश काढण्याची याच आयुक्तांवर नामुष्की आली.या अपंग कल्याण आयुक्तांचा जिल्हयातील या चळवळीतील कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

माहिती अधिकार कायदयाने आवश्यक माहिती किती ही वेळी मागविण्याचा अधिकार नागरिकांना आहे.योग्य अर्ज केल्यावर संबंधितांनी माहिती देणे , हे  बंधनकारक आहे."सर्वांनी माहिती अधिकार कायदयांचा सन्मान करण्याचे" आवाहन माहिती अधिकार कायदा चळवळीतील कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केले आहे.

No comments