Header Ads

तासवडे येथील संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टवर छापा ; सुमारे १० लाखाचा मलई पनीरचा साठा जप्त satara

सातारा : अन्न व औषध प्रशासन विभागाने सातारा कार्यालयाने प्राप्त माहितीच्या आधारे दि. २९ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजन्याच्या सुमारास कमी प्रतिचे पनीर हे उच्च दर्जाचे भासवून त्याचे उत्पादन व विक्री करणा-या एमआयडीसी तासवडे येथील संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. वर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या सातारा कार्यालयाने ९ लाख ७३ हजार ९९२ रूपये किंमतीचा मलई पनीर व कीमचा साठा जप्त केला. साताराचे सूपुत्र आणि पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारलेपासून अनेक नामांकित कंपन्यावरा धडक कारवाई केल्या असून कोट्यावधी रूपयांचा अन्न पदार्थ जप्त केले आहेत. यापुढेही या कारवाई अशाच सुरू रहातील असे देशमुख यांनी सांगितले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ६ एप्रिल २०१६ रोजी प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत कॅम्प पुणे येथील मॉडर्न डेअरीवर छापा टाकून १३ हजार ६९१ रूपये किमंतीचे हलक्या प्रतिचे दही, मलई, पनीर व क्रीम जप्त केले होते. सदरचे दुग्धजन्य पदार्थ हे तासवडे एमआयडीसी, ता. कराड मधील संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. येथे उत्पादीत केल्याचे आढळून आले होते. त्या अनुषंगाने अन्न प्रशासनाच्या सातारा कार्यालयाच्या अधिका-यांनी छापा टाकून हलक्या दर्जाचे मलाई पनीरचा १०२४.२ किलो किमंत रूपये २ लाख ४ हजार ८४० व हलक्या प्रतीची किमचा ४६८२.२ किलो किमंत रूपये ७,४९,१७२ चा साठा जप्त केला. मलई पनीच्या २४० ग्रॅमच्या पॅकेटवर मॉडर्न डेअरी, कॅम्प पुणे असे छापले होते. प्रत्यक्षात सदरचे पनीरचे उत्पादन कर्नाटक राज्यातील महालीगपुर येथे उत्पादन असून प्रत्यक्षात सदर पनीचे है मे. संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी, ता. कराड, जि. सातारा येथे उत्पादीत झाल्याचे भासवून पुढे केले जात होते. पंरतु सदचे पनीर हे कर्नाटक येथे उत्पादीत करून मे. संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी, ता. कराड, जि. सातारा येथे आणल्याचा कसल्याही प्रकारचा पुरावा ठेवला जात नव्हता. दुध व दुग्धजन्य पदार्थ ज्या ठिकाणी उत्पादीत केले जात होते त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात अस्वच्छता व जिवंत किटकांचा वावर आढळून आला. सदर डेअरीमध्ये आढळून आलेल्या अन्नपदार्थ पॅक करण्याच्या लेबलवर दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटीग मॉडर्न डेअरी कॅम्प पुणे यांनी केल्याचे आढळलेले आहे. प्रत्यक्षात मे. संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी, ता. कराड, जि. सातारा यांनी उत्पादीत केलेल्या दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटींग करण्याकरीता मॉडर्न डेअरी पुणे यांना परवाना नसल्याचे आढळले. सदरची कारवाई प्रशासनाच्या पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांचे निंयत्रणाखाली प्रशासनाचे पुणे कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार, युवराज ढेबरे व राहुल खंडागळे यांच्या पथकाने केली. सदर प्रकरणी अन्न नमुने घेणे, जप्ती कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा यांनी केली असून प्रयोगशाळेकडून नमुन्याचे अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल असे सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांनी सांगितले.

No comments